Tractor Yojana आधुनिक तंत्राद्वारे ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान

ट्रॅक्टर अनुदान योजना 2024

आता पारंपारिक पद्धतीने बैलाच्या साह्याने शेती मशागतीला वेळ अधिक लागतो आणि अधिक कष्टाची असल्याने शेतकऱ्यांचा कल हा आधुनिक तंत्राद्वारे म्हणजे ट्रॅक्टर द्वारे मशागत करण्याकडे अधिक वाढला आहे. मात्र प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेणे परवडत नाही आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ही तेवढी नसते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपले नवीन ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% पर्यंत अनुदान दिले जाते. आणि जास्तीत जास्त अनुदानाची रक्कम 1.25 लाख रुपयापर्यंत आहे.-Tractor Yojana

  • ट्रॅक्टर अनुदान योजनेची थोडक्यात माहिती
  • ट्रॅक्टर अनुदान योजनेद्वारे दिले जाणारे अनुदान
  • ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत होणारा फायदा
  • ट्रॅक्टर अनुदान योजना साठीची पात्रता
  • कृषी ट्रॅक्टर योजना साठीचे नियम व अटी
  • ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठीची कागदपत्रे
  • ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया
  • ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
  • ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
  • महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सोप्या पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे.
  • योजनेसाठी केंद्र सरकारचा 60 टक्के आणि महाराष्ट्र सरकारचा 40% सहभाग आहे.
  • योजनेसाठी लाभार्थी ठरलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी मार्फत जमा केली जाते

Tractor Yojana Apply

या ट्रॅक्टरचा वापर करून शेतकरी अत्यंत कमी वेळेत आपली नांगरणी ,पेरणी करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट देखील वाचणार आहेत. या योजने अंतर्गत 8 hp ते 70 ट्रॅक्टरटर साठी 50 % अनुदान दिले जाते. या योजनेचा उपयोग आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे. या योजनेअंतर्गत शेती व्यवसाय करायला प्रोत्साहन देणे हा आपल्या शासनाचा उद्देश आहे या योजनेअंतर्गत 60% केंद्र सरकार तर 40% राज्य सरकार मदत करते. ट्रॅक्टर योजनेअंतर्गत मिळणारा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो .ट्रॅक्टरच्या वापरामुळे अतिशय गतीने शेती नांगरून होणार आहेत. या योजनेसाठी आपण ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो.

Tractor Yojana 2024 Documents

ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा योजनेसाठी अर्ज करताना शासनाने ठरवून दिलेली काही महत्त्वाची कागदपत्रे अर्जदाराने सादर करणे आवश्यक आहे. ती पुढीलप्रमाणे

  • आधार कार्ड, रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • अर्जदाराचे जमिनीचा सात बारा
  • अर्जदाराच्या जमिनीचा अट अ
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईजचे दोन फोटो
  • स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र
  • जातीचा दाखला

Tractor Yojana Online Application

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराला सर्वात प्रथम महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. –https://mahadbt.maharashtra.gov.in/

त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल.

त्यावर नवीन अर्जदार नोंदणी या पर्याय वर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.

त्यामध्ये तुम्हाला विचारली सर्व माहिती तुम्ही अचूक पद्धतीने भरा.

माहिती भरून झाल्यानंतर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा.

अशा पद्धतीने नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

त्यानंतर अर्जदाराला आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.

लॉगिन झाल्यानंतर अर्जदारला होम पेजवर कृषी विभागात जावे लागेल व कृषी विभागात ट्रॅक्टर अनुदान योजना या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज उघडेल.

अर्ज उघडल्यानंतर त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.

त्यासोबत जोडावयाची सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावे लागतील.

अपलोड केल्यानंतर संपूर्ण माहिती एकदा तपासून पहा माहिती योग्य असल्यास रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा.

अशा पद्धतीने तुम्ही ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

tractor-yojana-maharashtra

Tractor Yojana Terms And Conditions

  • या योजना अंतर्गत जर 50 टक्के अनुदान दिले असेल तर तुम्हाला 1.25 लाख रुपये अनुदान देण्यात येणार नाही.
  • केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्याने यापूर्वी केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकारच्या इतर कुठल्याही योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी केलेला नसावा.
  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
  • Tractor Yojana योजनेचा लाभ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला घेता येईल यासाठी कुठल्याही जातीची अट नाही.
  • शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असल्यास त्या शेतकऱ्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे
Tractor Yojana

Application

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला कृषी विभागाच्या जिल्हा कार्यालयात जावे लागेल.

कृषी विभागातून ट्रॅक्टर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.  

अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा आणि अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडावीत.

त्यानंतर कृषी विभागात अर्ज जमा करावा.

या सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

Leave a Comment