ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
राज्यातील वैयक्तिक शेतकरी, उद्योजक (Entrepreneur), सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांना ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी योजना आहे.Sugarcane Harvester
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी ऊस तोडणी यंत्राच्या किंमतीच्या 40 टक्के अथवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल इतक्या रकमेइतके अनुदान देण्यात येते.
राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांचा शेती क्षेत्रात विकास व्हावा तसेच त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजना राबवित असते.
देशातल्या साखर उत्पादनापैकी एक तृतीयांश साखरेचे उत्पादन हे आपल्या महाराष्ट्र राज्यात होते. त्यामुळे ऊस शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असते परंतु विविध शैक्षणिक सुविधा, मजुरांना इतर क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या नवनवीन संधी, जीवनशैलीतील बदल तसेच आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्तर उंचावल्यामुळे दिवसेंदिवस ऊस तोडणी मजुरांची संख्या कमी होत चालल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे साखर कारखान्यांना ऊस तोडणीची समस्या भेडसावत आहे. ऊस तोडणीस उशीर झाल्यास साखरेच्या उताऱ्यावर याचा मोठा परिणाम होतो व उसाला कमी भाव मिळतो तसेच ऊस तोडणीच्या टप्प्यात कुशल मजूर उपलब्ध न झाल्यामुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
उसाच्या क्षेत्रामध्ये व उसाच्या उत्पादनामध्ये दरवर्षी वाढ होत चालली आहे व अपुऱ्या मनुष्यबळामुळे साखर कारखान्यांना सतत ऊसतोडीची समस्या निर्माण होत असते.त्यामुळे राज्यातील शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने राज्यात ऊस तोडणी यंत्रास अनुदान योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे:-Sugarcane Harvester
- ऊस तोडणी यंत्र घेऊ इच्छित असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आपल्या सरकारचा प्रमुख उद्दिष्टे योजनेमध्ये आहे.
- ऊस तोडणी यंत्रामुळे वेळेची बचत होणार आहे व योग्यवेळी ऊस तुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान होण्यापासूनन वाचणार आहे.
- अतिशय कमी खर्चामध्ये ऊस तोडणी झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसणार नाही.
- शेतीबरोबरच आपल्या राज्याचे औद्योगिक विकास करणे हा देखील या योजनेचा उद्देश आहे.
- ऊस तोडणी वेळेवर झाल्यामुळे शेतकरी ऊस लागवडीवर भर देणार आहेत जेणेकरून साखर उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.
ऊस तोडणी यंत्र योजनेअंतर्गत या महत्त्वाच्या गोष्टी
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ऊस तोडणी यंत्र योजनेचे नाव, लाभार्थीचे नाव, अनुदान वर्ष, अनुदान रक्कम इत्यादी तपशील कायमस्वरूपी राहील अशा स्वरूपात नोंदविणे आवश्यक आहे
- लाभार्थ्याने मंजूर झालेल्या ऊस तोडणी यंत्रासाठी महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केलेले कोटेशन व टेस्ट रिपोर्ट याप्रमाणे ऊस तोडणी यंत्र खरेदी करणे आवश्यक राहील
- अर्जाची नोंदणी झाल्यानंतर लाभार्थ्यांची निवड ही ऑनलाईन संगणकीय सोडत पद्धतीने केली जाईल
- त्यानंतर लाभार्थ्याला आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यात बाबत कळविण्यात येईल
- पूर्वसंमती पत्र मिळाल्या मिळालेल्या लाभार्थ्यांनी पूर्वसंमती पत्र दिलेल्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत ऊस तोडणी यंत्र खरेदी करणे आवश्यक आहे
- यंत्र खरेदी केल्यानंतर अनुदान मागणी करिता ऊस तोडणी यंत्र खरेदीचे बिल, नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी अर्ज केल्याची पावती ही कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी.
- या योजनेचा लाभ हा उद्योजक, वैयक्तिक शेतकरी यांना एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच घेता येईल.
- शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांना एका संस्थेसाठी एकाच ऊस तोडणी यंत्राचे अनुदान दिल्या जाईल
- सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना प्रत्येकी जास्तीत जास्त 3 ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान देण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ऊस तोडणी यंत्र किमतीचे 40% रक्कम अथवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल एवढे अनुदान देण्यात येईल
- लाभार्थ्याला किमान 20 टक्के स्वभांडवल म्हणून गुंतवणूक करणे आवश्यक आहे
- उर्वरित रक्कम उभारण्याची संपूर्ण जबाबदारी लाभार्थ्याची असेल
- या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राची परिवहन विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना २०२४ या योजनेच्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (Aadhar Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- रहिवासी दाखला (Residence Proof)
- अर्जदाराचे जमिनीचा सातबारा (7/12 Documents)
- अर्जदाराच्या जमिनीचा अट अ (8 A)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- ई-मेल आयडी (Email ID)
- पासपोर्ट साईजचेे दोन फोटो (2 Passport Size Photographs)
- स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र (Self Declartion Form)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- ऊस तोडणी यंत्राचे कोटेशन
- बंधपत्र
- सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांचे बाबतीत नोंदणी प्रमाणपत्र व संस्थेचे नावाचे बँक पासबुकची प्रत
ऊस तोडणी यंत्र योजनेच्या अटी व शर्ती
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- ज्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीचे काम केले जाणार आहे अर्जासोबत त्या कारखान्याचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे.
- कारखाना/ व्यक्तीगत लाभार्थी यांनी ऊस तोडणी यंत्राचा वापर त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस तोडणी संपेपर्यंत करणे बंधनकारक आहे.
- केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थांकडून तपासणी झालेल्या ऊस तोडणी यंत्रांसाठीच अनुदान देण्यात येईल.
- ऊस तोडणी यंत्राची निवड करण्याची जबाबदारी संबंधित साखर कारखाना अथवा लाभार्थ्यांची असेल.
- या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ऊस तोडणी यंत्राचा वापर फक्त महाराष्ट्र राज्यात करणे आवश्यक आहे त्यामुळे लाभार्थ्याला ऊस तोडणी यंत्राचा वापर राज्याच्या बाहेर इतर राज्यात करता येणार नाही तसे करताना संबंधित लाभार्थी आढळून आल्यास त्याच्यावर कार्यवाही केली जाईल व अनुदानाची राशी वसूल केली जाईल.
- ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीनंतर ऊस तोडणी यंत्रास काम मिळवण्याची संपूर्ण जबाबदारी यंत्र खरेदीदाराची असेल त्यासाठी राज्य शासनाद्वारे कुठल्याच प्रकारची मदत केली जाणार नाही.
- ऊस तोडणी यंत्र चालवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्याची जबाबदारी यंत्र पुरवठादाराची असेल. त्यामुळे प्रशिक्षणाची खात्री करुनच खरेदीदाराने यंत्राची निवड करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने या पूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीवर अनुदान मिळवले असल्यास अशा अर्जदारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- लाभार्थ्याला ऊस तोडणी यंत्राची किमान 6 वर्ष विक्री/ हस्तांतरण करता येणार नाही तसे आढळल्यास लाभार्थ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व देण्यात आलेली अनुदानाची रक्कम वसूल केली जाईल.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी इच्छुक अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया
- Sugarcane Harvester Yojana Online Apply
- ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल
- त्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
- त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये स्वतःची नोंदणी करावी लागेल
- त्यानंतर अर्जदाराला युजरनेम आणि पासवर्ड च्या मदतीने लॉगिन करावे लागेल
- लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये शेतकरी योजना यावर क्लिक करावे लागेल
- त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज करा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल
- त्यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण च्या समोर बाबी निवड वर क्लिक करावे लागेल
- त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल
- त्यानंतर जतन करा या पर्यावरण क्लिक करावे लागेल
- त्यानंतर तुमच्यासमोर पहिले पेज उघडेल त्यामध्ये अर्ज करा या पर्यावर क्लिक करावे लागेल
- त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये पहा या पर्यावर क्लिक करावे लागेल
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये प्राधान्य क्रम मध्ये 1 निवडून टीक करून अर्ज सादर करा या बटन वर क्लिक करावे लागेल
- त्यानंतर तुम्हाला मेक पेमेंट या बटनवर क्लिक करा
- आता तुमच्या समोर पैसे भरण्यासाठी विविध पर्याय दिसतील त्यामधील तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला पैसे भरावे लागतील
- त्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यावी लागेल
- अशा प्रकारे तुम्ही ऊस तोडणी यंत्र योजनाची अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घेऊ शकता
अनुदान मागणी करिता बटनवर क्लिक करा