मुख्यमंत्री योजना दूत 2024 माहिती:- Yojana Doot
Yojana Doot Bharti 2024 ही योजना दूत सरकारच्या विविध योजनांची माहिती राज्यातील नागरिकांना देण्याचे काम करणार आहे. ज्या नागरिकांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्या नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून देणे हे या योजना दूत असलेल्या व्यक्तीचे मुख्य काम आहे. जेणेकरून तळागाळातील लोकांनाही सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ मिळू शकेल.
महाराष्ट्र शासनाने विविध योजना ची प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचप्रमाणे जास्तीत जास्त नागरिकांना योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने 50 हजार योजनादूत निवडीसाठी 24-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यात येणारआहे व या निर्णयाला मान्यता पण देण्यात आलेली आहे तर आज आपण योजना दूत काय आहे ऑनलाइन अर्ज कसा करायचा यासंबंधी संपूर्ण माहिती घेणार आहोत.Yojana Doot Bharti 2024 महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे राज्यातील योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आणि नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री योजना दूत पदाच्या 50 हजार रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हीही मुख्यमंत्री योजना दूत पदासाठी अर्ज करून योजना दूत म्हणून काम करू शकता.
Yojana Doot Bharti 2024 महाराष्ट्र सरकारकडून योजना दूत भरती प्रक्रियेसाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या भरतीच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री योजना दूत चे मुख्य काम:- Yojana Doot
- शासकीय योजना आणि त्यांची माहिती गावागावात आणि शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवणे.
- नागरिकांना योजनेचा लाभ घेता यावा तसेच अर्ज कसा करावा याची मदत त्यांच्यामार्फत केली जाईल.
- शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक प्रशासनाला त्यांच्यामार्फत मदत करणे.
- योजना दूत म्हणून जनजागृती मोहिमांमध्ये सहभागी नोंदविणे.
मुख्यमंत्री योजना दूतची थोडक्यात माहिती:- Yojana Doot
- महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची प्रसिद्धी करणे व त्याचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे यासाठी मुख्यमंत्री योजना दूत यांची थेट ग्रामस्तरावर नियुक्ती करण्यात येणार आहे.
- महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क कार्यालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे.
- ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत साठी एक व शहरी भागात 5000 लोकसंख्या साठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण 50 हजार योजना दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10 हजार रुपये प्रति महिना मानधन देण्यात येईल (प्रवास खर्च सर्व भत्ते समावेशित).
- निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत सहा महिन्याचा करार केला जाईल हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही.
मुख्यमंत्री योजना दूत यांची निवडीसाठी आवश्यक पात्रता:- Yojana Doot
- उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष वयोगटातील असावे
- उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक
- संगणक ज्ञान असणे आवश्यक
- उमेदवार कडे मोबाईल असणे आवश्यक
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक
- उमेदवाराचे आधार कार्ड आणि बँक पासबुक असणे आवश्यक
- उमेदवार किमान १०वी किंवा १२वी पास असणे आवश्यक आहे.
- त्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे अपेक्षित असणार आहे, ज्यामुळे ते ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि नागरिकांनी ची माहिती संकलन सुलभपणे करू शकणारे हवे.
निवड झालेल्या योजना दुताने करायची कामे:- Yojana Doot
- योजना दूत Yojana Doot त्याला सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत.
- योजना दूत असे करत असल्याचे निदर्शनास आले असता त्याच्यासोबत करण्यात आलेला करार रद्द करून त्याला कार्यमुक्त करण्यात येईल.
- योजना दूत Yojana Doot अनधिकृत रित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन देण्यात येणार नाही.
- योजना दूत Yojana Doot संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील.
- प्रशिक्षित योजना त्यांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे आवश्यक आहे.
- योजना दूत राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रसार आणि प्रचार करताना ग्राम पातळीवरील यंत्रणाशी समन्वय करून सरकारच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करेल.
- योजना दुताने Yojana Doot दिवसभर केलेल्या कामाची माहिती त्याला दररोज ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी लागेल.
मुख्यमंत्री योजना दुताची नेमणूक प्रक्रिया:- Yojana Doot
- उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्तराजांच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क मंत्रालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संकेतस्थळामार्फत ऑनलाईन रित्या पूर्ण करण्यात येईल.
- पात्र असलेल्या उमेदवारांचे अर्जाची छाननी करण्यात येईल.
- ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल.
- जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाची संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी करतील. यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादा विषयक मूळ कागदपत्रे तपासली जातील.
- त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्याचा करार केला जाईल. तसेच कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही.
- जिल्हा माहिती अधिकारी निवड झालेल्या योजना दिसतात योजनांची माहिती संदर्भात समुपदेशन व निर्देशांक करतील.
- जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत साठी एक शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात उमेदवारांना योजना दूत म्हणून पाठवतील.
योजना दूत निवडीसाठी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे:- Yojana Doot
- विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज
- पदवी प्रमाणपत्र आवश्यक आहे
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- टीसी किंवा जन्म प्रमाणपत्र
- हमीपत्र (नियुक्तीनंतर जमा केले जाईल)
मुख्यमंत्री योजना दूतची अर्ज प्रक्रिया:- Yojana Doot
- सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करताना योजना दूतच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
- त्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अप्लाय हा पर्याय निवडा
- त्यानंतर तुमच्यासमोर योजना दूत रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल
- या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही अचूक पद्धतीने भरा
- त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा
- नोंदणी केल्यानंतर तुमच्या समोरील होम पेजवर मुख्यमंत्री योजना दूत ऑनलाईन अप्लाय लिंक यावर क्लिक करा
- त्यानंतर तुमच्यासमोर योजना दूत भरती अर्ज प्रक्रिया ओपन होईल तिथे तुम्हाला त्या योजनेचा अर्ज यावर क्लिक करायचे आहे
- त्यानंतर तुम्हाला तिथे विचारलेली संपूर्ण माहिती भरायचे आहे. यामध्ये नाव, पत्ता, वय, शैक्षणिक पात्रता आदी
- त्यानंतर तुमची आवश्यक सर्व कागदपत्रे तिथे अपलोड करा
- बँकेची पासबुक ची झेरॉक्सही अपलोड करावी लागेल
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज एकदा तपासून घ्यायचा आहे
- अर्ज तपासून घेतल्यानंतर तुम्ही अर्ज सबमिट या बदनावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करू शकता
- अशा सोप्या पद्धतीने तुम्ही योजना दूत भरती 2024 साठी अर्ज करू शकता. अर्ज भरल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी करून तुम्ही पात्र ठरल्यास तुमची मुख्यमंत्री योजना दूत म्हणून नियुक्ती केली जाईल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: – Yojana Doot
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: – Yojana Doot