मागेल त्याला सोलर पंप Saur Krushi Pump Yojana
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना(Saur Krushi Pump Yojana)भारत देश हा एक कृषीप्रधान देश असून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी विजेची पूर्तता योग्य वेळी होत नसल्या कारणामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यास विविध अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सोडवण्याकरिता महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाची आणि नाविन्यपूर्ण योजनेची सुरुवात केलेली आहे त्या योजनेचे नाव मागेल त्याला सौर कृषी पंप असे आहे.
नमस्कार मित्रांनो अंतरिम अर्थसंकल्पामध्ये एका नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे त्या योजनेचे नाव आहे मागेल त्याला सोलर पंप ही योजना काय आहे? या योजनेचे उद्दिष्ट काय आहे? या योजनेचे अर्ज कसा करायचा? कागदपत्रे काय लागणार आहेत? याला ऑनलाईन अप्लाय कसं करायचं? ही सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.
शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौरकृषी पंप’ (Saur Krushi Pump Yojana)ही नवीन योजना राबविण्यात येत असून, ८ लाख ५० हजार नवीन सौर कृषी पंप देण्याची घोषणा करण्यात आली. याशिवाय सर्व उपसा सिंचन योजनांचे दोन वर्षांत सौर ऊर्जीकरण केले जाणार आहे
मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत जसे की,
- पात्रता,
- आवश्यक कागदपत्रे,
- अर्ज करण्याची पद्धत आणि या
- योजनेअंतर्गत मिळणारे लाभ.
मागेल त्याला सोलर पंप योजनेची माहिती.
- मागेल त्याला सोलर पंप योजना २०१५ पासून सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात आल्याने महाराष्ट्र शासनाने विविध सौर कृषी पंप योजना राबवायला सुरुवात केली आहे. याआधी “अटल सौर कृषी पंप योजना” आणि “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना” यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या होत्या.
सध्या “प्रधानमंत्री कुसुम योजना – घटक ब” अंतर्गत सौर कृषी पंपांचा वापर सुरू आहे. ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र मध्ये एकूण २,६३,१५६ सौर कृषी पंप बसवण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेच्या या योजनांना दिलेला प्रतिसाद आणि त्यांना झालेला फायदा लक्षात घेऊन सरकारने “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” जाहीर केली आहे. - या योजनेत भाग घेण्यासाठी, सामान्य गटातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाच्या किंमतीचा दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे, तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांना फक्त ५% रक्कम भरावी लागेल.
- ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत असा जलस्रोत आहे आणि ज्या भागात पूर्वीपासून पारंपारिक कृषीपंपासाठी वीजपुरवठा उपलब्ध नाहीये, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. महावितरणकडे पैसे भरलेले आहेत मात्र वीज कनेक्शन प्रलंबित आहेत असे शेतकरी या योजनेचा प्रामुख्याने समाविष्ट होतील.
- २०१५ पासून सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात आल्याने महाराष्ट्र शासनाने विविध सौर कृषी पंप योजना राबवायला सुरुवात केली आहे. याआधी “अटल सौर कृषी पंप योजना” आणि “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना” यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या होत्या.
सध्या “प्रधानमंत्री कुसुम योजना – घटक ब” अंतर्गत सौर कृषी पंपांचा वापर सुरू आहे. ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र मध्ये एकूण २,६३,१५६ सौर कृषी पंप बसवण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेच्या या योजनांना दिलेला प्रतिसाद आणि त्यांना झालेला फायदा लक्षात घेऊन सरकारने “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” जाहीर केली आहे. - या योजनेत भाग घेण्यासाठी, सामान्य गटातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाच्या किंमतीचा दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे, तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांना फक्त ५% रक्कम भरावी लागेल.
योजनेची माहिती पुस्तिका मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
मागेल त्याला सोलर पंप योजनेची वैशिष्टये (Saur Krushi Pump Yojana)
पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्हयात आस्थापना शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार.
शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP. 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (HP) DC सौर पंप mahaurja solar pump उपलब्ध होणार.
सर्व साधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसुचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थी हिस्सा.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना पात्रता(Saur Krushi Pump Yojana)
- शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदीनाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
- सर्वप्रथम अर्जदार हा एक शेतकरी असावा तसेच महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांचा सातबारा उतारा वरती बोरवेल, विहीर, शेततळे नोंद असावी किंवा बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारी जर शेतकऱ्याची जमीन असेल तरच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी
- Magel Tyala Solar Pump पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार.
- 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DC वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आवश्यक कागदपत्रे
- शेतकऱ्यांचे आधार कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक किंवा चेक बुक (धनादेश प्रत)
- 7/12 उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. 200/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
- शेत जमीन किंवा विहीर किंवा बोर सामायिक असेल तर इतर भागीदारांची ना हरकत प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.
- जातीचे प्रमाणपत्र (Sc आणि St प्रवर्गासाठी आवश्यक)
सौर पंपाच्या मागणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी खालील बटनावर क्लिक करा
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज प्रक्रिया
मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये अर्ज करण्याकरिता खालील सांगितलेली माहिती व्यवस्थित रित्या वाचून घ्या आणि अर्ज करा.
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र कुसुम सौर पंप योजनेच्या Magel Tyala Saur Krushi Pump जावे लागेल .
- आता कुसुम सौर पंप नोंदणी पृष्ठ तुमच्या समोर उघडेल.
- यानंतर तुम्हाला रजिस्टर/अर्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
- रजिस्टर वर क्लिक केल्यानंतर तुम्ही OTP Verify पेजवर पोहोचाल.
- आता तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP प्राप्त झाला असेल, तो येथे एंटर करा.
- यानंतर तुमचा ओटीपी पडताळला जाईल आणि तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- यानंतर तुमच्या समोर महाऊर्जा कुसुम सौर पंप योजना लॉगिन पेज उघडेल.
- येथे तुम्हाला तुमचा वापरकर्ता इत्यादी आणि पासवर्ड आणि लॉगिन प्रविष्ट करावे लागेल.
- Kusum.mahaurja.com Magel Tyala Solar Pump वर लॉग इन केल्यानंतर , डॅशबोर्ड तुमच्या समोर उघडेल.
- आता तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- त्यानंतर तुम्हाला अंतिम घोषणा द्यावी लागेल.
- यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक संदेश प्राप्त होईल.
- वरील संदेश प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराला जहाज आणि पंपासाठी कोटेशन प्राप्त होईल .
- तुम्हाला कोटेशन तपासावे लागेल .
- खाली दिलेल्या नमुन्यातून तुम्ही अवतरण समजू शकता.
- यानंतर तुम्हाला पे मनी या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- अर्जदार पंपासाठी 3 पद्धतींद्वारे (ऑनलाइन, डीडी आणि चलन) रक्कम भरू शकतात.
- यापैकी एक पद्धत निवडून पेमेंट करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना योजनेअंतर्गत मिळणारे लाभ.
मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना त्यांच्या Caste प्रमाणे दिला जाणार आहे जसे कि,
या योजनेत भाग घेण्यासाठी, सामान्य गटातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाच्या किंमतीचा दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे, तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांना फक्त ५% रक्कम भरावी लागेल.
अर्जदार शेतकरी जर एससी किंवा एस टी प्रवर्गातील असेल तर अशा शेतकरी बांधवाना सौर पंपाच्या एकूण किमतीच्या ५ टक्के रक्कम लाभार्थी हिस्सा म्हणून भरावी लागणार आहे.
अर्जदार जर खुल्या प्रवर्गातील असेल तर मात्र पंपाच्या एकम किमतीच्या १० टक्के रक्कम शासनास भरावी लागणार आहे.