Maharashtra post matric scholarship scheme 2024 In Marathi : विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना:-Maharashtra post matric scholarship

अनुसूचित जाती प्रवर्गातील मुला-मुलीना उच्च शिक्षण घेणे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचा आदर्श घेवून उच्चविद्याविभूषित होणे, हा उउदेश ठेवून अनुसूचित जाती (नवबौद्धसह) विद्यार्थ्याकरिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती | Post Matric Scholarship for SC students योजना हि सन-१९५९-६० पासून राबवण्यात येत आहे.सदर योजनेंतर्गत अनुसूचित जाती (नवबौद्धसह) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला जातो व संबधित शैक्षणिक संस्थेस शिक्षण फी परीक्षा फी अदा केली जाते.या योजनेंतर्गत पालकांचे उत्पन्न मर्यादा हि आता २.०० लाखावरून २.५० लाख करण्यात आली आहे.

post matric scholarship scheme in marathi विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यांना उच्च शिक्षण घेता यावे हा या योजनेमाचा मुख्य उद्देश आहे.या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना परीक्षा फी, ट्युशन फी, मेन्टनन्स अलाउन्स, वस्तीगृहासाठी दरमहा आर्थिक मदत मिळणार आहे. ती कशी आपण संपूर्ण माहिती बघूया. Maharashtra post matric scholarship scheme 2024.

योजनेचे नावपोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
कधी सुरू केली1959 -60
उद्देशविद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे
लाभशिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता उपलब्ध करून देणे
लाभार्थीअनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थी
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाइटhttps://mahadbt.maharashtra.gov.in/

1.अनुसूचित जातीतील विद्यार्थ्याना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.

2.विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवणे.

3.विद्यार्थ्यांना शिक्षण सुरु असताना निर्वाह भत्तासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे.

4.शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे.

5.विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांच्यात शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे

6.विद्यार्थ्यांना भत्ते स्वरूपात आर्थिक सहाय्य देणे.

7.विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.

  • विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विविध भत्ते स्वरूपात आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी हि योजना आहे.
  • विद्यार्थी घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवू शकतो त्यामुळे त्याला कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने राज्य सरकार यांच्या एकत्रिकरणाने करण्यात आलेली आहे.
  • या योजनेअंतर्गत केंद्र सरकारचा 60 टक्के राज्य सरकारचा 40% हिस्सा आहे.
  • या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली असल्यामुळे अर्जदार विद्यार्थी घरबसल्या या योजनेचा अर्ज करू शकतो.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा केली जाईल.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता दिला जाईल.
  • राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची आवड निर्माण होईल.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थी आत्मनिर्भर बनतील.
  • विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना इतरांवर पैशासाठी अवलंबून राहण्याची आवश्यकता राहणार नाही.
  • योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील.
  • राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
  • राज्यात कोणताही विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहणार नाही.
  • विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची देखील आवश्यकता भासणार नाही.
  • विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
  • विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयी आवड निर्माण होईल.

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना द्यावयाचा निर्वाह भत्याचे सुधारित दर खालीलप्रमाणे

गट 1देखभाल भत्ता550/- रुपये (दरमहा)
गट 2देखभाल भत्ता530/- रुपये (दरमहा)
गट 3देखभाल भत्ता300/- रुपये (दरमहा)
गट 4देखभाल भत्ता230/- रुपये (दरमहा)
होस्टेलर
गट 1देखभाल भत्ता1200/- रुपये (दरमहा)
गट 2देखभाल भत्ता820/- रुपये (दरमहा)
गट 3देखभाल भत्ता570/- रुपये (दरमहा)
गट 4देखभाल भत्ता380/- रुपये (दरमहा)
दिव्यांग (अपंगत्व प्रकार) असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त भत्ते पुढीलप्रमाणे
अपंगत्वाचे प्रकार
गट 1अंधत्व / कमी दृष्टी150/- रुपये (दरमहा)
गट 2अंधत्व / कमी दृष्टी150/- रुपये (दरमहा)
गट 3अंधत्व / कमी दृष्टी125/- रुपये (दरमहा)
गट 4अंधत्व / कमी दृष्टी100/- रुपये (दरमहा)
  • .लाभार्थी हा भारताचा रहिवासी असला पाहिजे.
  • अर्जदार हा अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
  • .अर्जदार हा मॅट्रिकोत्तर, उच्चमाध्यमिक किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार हा पात्र असेल.
  • .ज्या विद्यार्थ्याच्या पालकाचे सर्व स्रोतद्वारे मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.२,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.
  • या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना घेता येईल.
  • महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेचा लाभ मुलं-मुली या दोघांनाही घेता येईल.
  • अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता दिला जाईल.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • जर विद्यार्थी नापास झाला तर त्याला परीक्षा शुल्क आणि देखभाल भक्ता देण्यात येईल. एकाच वर्गात दुसऱ्या वेळी देखील नापास झाला तर त्याला कोणताही भत्ता मिळणार नाही आणि दोन्ही प्रयत्नानंतर तिसऱ्या वेळी विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेला तर त्याला लाभ आनुज्ञेय आहे.
  • महाराष्ट्र बाहेर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील भारत सरकारच्या समान नियमानुसार राहतील
  • अर्जदार विद्यार्थ्यांनी यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारच्या सुरू असलेल्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • गतवर्षी च्या परीक्षेची गुणपत्रिका
  • दहावी किंवा बारावी ची गुणपत्रिका
  • शिक्षणात खंड पडला असेल तर गॅप सर्टिफिकेट
  • वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • होम पेजवर गेल्यावर नवीन अर्जदार नोंदणी या वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यावर रजिस्टर यावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुम्ही नवीन अर्जाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकाल.
  • त्यानंतर अर्जदाराला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर एक होमपेज ओपन होईल.
  • त्यामध्ये पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर Social Justice and Special Assistance Department यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये माहिती दिलेली असेल ती माहिती वाचून Apply for This Scheme या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज उघडेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
  • त्यानंतर अर्ज सोबत आवश्यकती कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
  • त्यानंतर रजिस्टर या बटन वर क्लिक करावे लागेल.
  • अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment