मागेल त्याला शेततळे योजना 2024 Magel Tyala Shettale Yojana

मागेल त्याला शेततळे योजना

महाराष्ट्र सरकार नेहमीच आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवीत असते. आता शेतकऱ्यांच्या मागणी नुसार महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे हि योजना सुरु केली आहे. मागेल त्याला शेततळे योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांना  पाण्याचा स्थायी स्रोत उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाद्वारे सुरु करण्यात आलेली महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळे तयार करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते.Shettale Yojana

तर मग चला मित्रांनो आपण या लेखात मागेल त्याला शेततळे अनुदान योजने बद्दल संपूर्ण माहिती पाहू. जसे कि मागेल त्याला शेततळे योजना काय आहे, या योजनेसाठी लागणारी पात्रता, उद्दिष्टे, कागदपत्रे, ऑनलाइन नोंदणी, ऑफलाइन अर्ज, इत्यादी माहिती पाहणार आहोत. तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.

योजनामागेल त्याला शेततळे योजना
सुरुवातमहाराष्ट्र शासनाने सुरू केली
योजनेचा उद्देशमागेल त्या शेतकऱ्याला शेततळे तयार करून दिले अथवा शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत करणे
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
लाभ75,000 रुपये
अर्जऑनलाईन
अधिकृत वेबसाईटऑनलाईन लिंक साठी इथे क्लिक करा
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेतात तळे खोदण्यासाठी अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत करणे.
  • शेती पिकाचे पाण्याविना होणारे नुकसान टाळणे व शेतीच्या उत्पन्नात वाढ करणे.
  • राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित व प्रोत्साहित करणे.
  • शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करून त्यांचे राहणीमान सुधारणे
  • निश्चित स्वरूपाचा शेतीसाठी पाणीपुरवठा मिळवण्यासाठी शेतकऱ्याला मदत होईल.
  • शेततळे बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे.
  • पहिल्या टप्प्यांमध्ये 51,369 शेततळे तयार करणे.
  • पाहिजे तेव्हा शेतीसाठी पाणीपुरवठा पुरवठा मिळवा यासाठी योजना सुरू केली.
  • शेती पिकाच्या नुकसानीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जातील.
  • मागेल त्याला शेततळे योजनेचे मध्ये मिळणारे अनुदान थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
  • शेतकऱ्यांच्या पिकाचे पाण्याअभावी नुकसान होणार नाही. परिणामी पिकाच्या उत्पादनात वाढ होईल.
  • शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळत असल्याकारणाने शेतकरी शेतासाठी निश्चित स्वरूपाचा पाणीपुरवठा करून घेऊ शकतील.
  • या योजनेला सोपे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे देणार ‘ योजना आखली. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला पाण्या चे नियोजन करता येणार आहे.
  • शेततळे बांधण्यासाठी महाराष्ट्र शासन 50 हजार पेक्षा जास्त रुपये अनुदान शेतकऱ्यांना देणार.
Shettale Yojana
  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. जात प्रमाणपत्र ( असेल तर )
  4. रहिवासी पुरावा
  5. आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक पाहिजे
  6. बँकेला आधार सीडिंग (seeding ) केलेले पाहिजे.
  7. उत्पन्नाचा दाखला
  8. सातबारा उतारा व आठ अ
  9. पासपोर्ट फोटो
  10. बीपीएल योजनेचे कार्ड ( असेल तर )
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ दिला जाईल.
  • शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर कमीत कमी 60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
  • या योजनेंतर्गत कृषी विभागाचे अधिकारी यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी, निश्चित केलेल्या आकारमानानुसार शेततळे बांधणे बंधनकारक राहील.
  • शेततळे तयार करण्याचा आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम हे तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक असेल.
  • लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतःच राष्ट्रीय बँक किंवा इतर बँकमधील खाते क्रमांक सबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याकडे पासबुकच्या झेरॉक्ससह सादर सादर करणे गरजेचे आहे.
  • शेतकऱ्याच्या 7/12 उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक असेल.
  • शेताच्या बांधावर व  पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये वनस्पतीची लागवड करणे बंधनकारक आहे.
  • शेततळ्याच्या कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम दिली जाणार नाही.
  • शेततळ्याच्या दुरस्तीची आणि निगा राखण्याची जवाबदारी संबधित लाभार्थी शेतकऱ्यांची राहील.
  • पावसाळ्यामध्ये शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही, याची दक्षता शेतकऱ्यांनी स्वतः करावी.
  • शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्याने स्वखर्चाने लावणे बंधनकारक असेल.
.अ.क्रशेततळे आकारमान ( मी.)
इनलेट/आउटलेट खाणकाम व
ट्रॅप्स सोबत येणारे
शेततळे
( सरकारी अनुदान रक्मम (रु.) )
(बाजूचा उतार १:१)

इनलेट/आउटलेट खाणकाम व
ट्रॅप्स सोबत न येणारे
शेततळे
( सरकारी अनुदान रक्मम (रु.) )
(बाजूचा उतार १:१)
1.15X15X323,881/-18,621/-
2.20X15X332,034/-26,774/-
3.20X20X343,678/-38,417/-
4.25X20X355,321/-50,061/-
5.25X25X370,455/-65,194/-
6.30X25X375,000/-75,000/-
7.30X30X375,000/-75,000/-
8.34X34X375,000/-75,000/-
Shettale Yojana
  • सुरुवातीला अर्ज करण्याची प्रक्रिया ही या [ https://egs.mahaonline.gov.in/ ] वेबसाईटवर होती. यामध्ये बदल केलेला आहे.
  • आता मागेल त्याला शेततळे योजना अर्ज करण्याची पद्धत ही [ https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login ] या वेबसाईटवर सुरू आहे.
  • या वेबसाईट वर गेल्यानंतर आधी तुमचे प्रोफाईल बनवावे लागेल.
  • प्रोफाइल बनवल्यानंतर तुम्ही लॉगिन हे वापर कर्ता आयडी आणि आधार क्रमांक याद्वारे करू शकता.
  • त्यानंतर अर्ज करा हा ऑप्शन निवडून तुम्ही सिंचन साधने व सुविधा पर्याय निवडा.
  • हा पर्याय निवडल्यानंतर वैयक्तिक शेततळे हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर उपघटकांमध्ये इनलेट्स आउटलेट् किंवा यामध्ये दुसरा घटक आहे इंडियन आउटलेट शिवाय यापैकी कोणताही पर्याय निवडा.
  • शक्यतो इनलेट आउटलेट शिवाय तुम्ही हा पर्याय निवडून अर्ज करा. शेततळे लवकर मंजूर होते.
  • निवडल्यानंतर तुम्ही परिणाम या ठिकाणी निवडा म्हणजे शेत तळ्याची साईज कशी पाहिजे ती या ठिकाणी निवडू शकता.
  • निवडल्यानंतर सबमिट हा ऑप्शन आहे तरी या ठिकाणी सबमिट करा आणि शेवटी पेमेंट करून अर्ज सादर करा.

Leave a Comment