100 टक्के अनुदान : Kadba kutti machine anudaan yojana 2024

Kadba kutti machine anudaan yojana कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना

शेतातून मिळणाऱ्या चाऱ्याचा उपयोग शेतकरी त्यांच्या पशुपालन या व्यवसायामध्ये करत असतात.शेतातून मिळणारा चार हा लांब तसेच मोठ्या उंचीचा असल्यामुळे तो जास्त जागा घेऊन शेतकऱ्याच्या जागा व्यवस्थापनामध्ये अडथळा निर्माण करतो.चाऱ्याची उंची जास्त असल्यामुळे त्याचे लहान भाग करून तो जनावरांना द्यावा लागतो यासाठी खूप मेहनत तसेच यामध्ये जास्त मनुष्यबळ हि लागते.या पद्धतीमध्ये शेतकऱ्यास इजाही होऊ शकते.लहान भाग केलेला चार हा सम प्रमाणात नसल्याने जनावरांना खाण्यास त्रास होतो तसेच व्यवस्थितपणे रवंथ हि होत नाही.या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक उपक्रम किंवा योजना अंमलात आणली आहे. Kadba Kutti Machine

आज आपण कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना या विषय संपूर्ण माहिती पाहणार आहोत . जर या योजनेअंतर्गत अनुदान मिळवायचे असेल तर हा लेख अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे . महाराष्ट्र शासनाने गोरगरीब शेतकऱ्यांच्या विकासासाठी व कल्याणासाठी ही कडबा कुट्टी अनुदान योजना सुरू केलेली आहे.Kadba Kutti Machine

योजनेचे नावकडबा कुट्टी मशीन योजना
यांनी सुरु केलेराज्य आणि केंद्र सरकार
लाभार्थीदेशातील लहान शेतकरी आणि पशुपालक
अनुदान20,000 रुपये
उद्देश्यजनावरांचा चारा कापण्यासाठी दळण्यासाठी पशुपालकांना मशीन उपलब्ध करून देणे.
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन किंवा ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटmahadbt.maharashtra.gov.in
  • आर्थिक सहाय्य आणि अनुदान उपलब्धता :
  1. कडबा कुटी मशीनचा वापर करून हिरवा चारा कट करून तो शेतकऱ्यांना उन्हाळ्यात देखील वापरता येईल अशा पद्धतीने त्याच्या शेतकऱ्यांना नियोजन करता येते.
  2. कडबा कुट्टी मशीन योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचा वेळ आणि त्यासाठी लागणारी मेहनत कमी करून लवकरात लवकर कामे व्हावीत हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  3. शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतो. आणि त्यासाठी शेतकऱ्यांना गाईसाठी किंवा म्हशीसाठी चारा हा आवश्यक असतो, तो चारा कापण्यासाठी शेतकऱ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागते या मशीनच्या माध्यमातून शेतकऱ्याचा वेळ आणि कष्ट दोन्ही वाचणार आहेत.
  4. असे जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्याकडे कडबा कुटी मशीन घेण्यासाठी पैशांची कमतरता असते अशा शेतकऱ्यांसाठी अनुदानाच्या माध्यमातून मशीन घेऊन दिले जाणार आहे.
  • शेती व पशुपालनामध्ये यांत्रिकीकरणास प्रोत्साहन :
  1. पशुपालनामध्ये विजेवर चालणाऱ्या कडबा कुट्टी मशीन ला अनुदान तसेच आर्थिक सहाय्य करून लहान तसेच मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे.
  2. पशुपालनामध्ये विजेवर चालणाऱ्या कडबा कुट्टी या अत्याधुनिक यंत्राचा वापर करून पशुपालक आपल्या उत्पादनामध्ये तसेच उत्पन्नामध्ये वाढ करू शकतात.
  3. कडबा कुट्टी मशीनद्वारे, देशातील शेतकरी आणि पशुपालकांना कडबा कुट्टी मशीनचा लाभ मोफत मिळणार आहे.
  4. कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत, सरकार कुट्टी मशीनसाठी शेतकऱ्यांना 20,000/- रुपयांपर्यंत अनुदान देणार आहे.
  5. ही रक्कम सरकारकडून DBT द्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पाठवली जाईल.
  6. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी स्वयंचलित आणि हाताने चालणारी मळणी मशीन खरेदी करू शकतात.
  7. कडबा कुट्टी यंत्र योजनेचा लाभ घेऊन शेतकरी त्यांच्या जनावरांसाठी चांगल्या आणि विविध प्रकारच्या कुट्ट्या बनवू शकतील.
  8. या यंत्राद्वारे हिरवे गवत भरड पावडर आणि बारीक चारा बनवता येतो.
  • चारा मशीनद्वारे कापल्याने त्याचे खूप लहान तुकडे होतात, त्यामुळे जनावरांना खाणे एकदम सोपे जाते.
  • कमी जागेत चारा साठवता येतो.
  • कडबा कुट्टी मशीन योजनेमुळे पशुसांठी लागणारा चार जलद गतीने तसेच अचूकरित्या कुट्टी करून दिला जातो.
  • कडबा कुट्टी मशीन योजनेमुळे पशुपालक तसेच शेतकरी यांचा वेळ तसेच परिश्रम कमी होईल.
  • कडबा कुट्टी मशीनची बांधणी हि टिकाऊ आणि मजबूत असल्यामुळे देखभाल खर्चही कमी येतो.
  • कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांना आर्थिक सहाय्य तसेच अनुदान उपलब्ध होते.
  • कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ घेऊन शेतकरी पशुधनासाठी जलद गतीने तसेच अचूकरीत्या चार उपलब्ध करू शकतात.
  • पशुपालन करताना जनावरांना खाद्य देणे हे खूप कठीण काम असते त्यांना कडबा सारख्या खात्यांना बारीक करून देण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे कडबा कुट्टी मशीन अतिशय उपयोगी ठरते व या मशीनवर आता लाभार्थी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान प्राप्त होणार आहे .
  •  शेतकऱ्यांना कोणताही खर्च न करता थेट त्यांच्या घरामध्ये कडबा कुट्टी मशीन येणार आहे .
  • या योजनेअंतर्गत पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत कडबा कुट्टी मिळाली तर त्यांच्या पशुपालन करण्यासाठी लागणारा वेळ बऱ्याच प्रमाणात वाचला जातो व त्या वेळा ते शेतीतील इतर कामे करू शकतील अशा प्रकारचे अनेक फायदे या योजनेचे आहे .

जर तुम्हाला कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेली पात्रता पूर्ण करावी लागेल.

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असला पाहिजे.
  • अर्जदाराकडे कमीत कमी २ पशुधन असणे अनिर्वाय असेल
  • ज्या शेतकऱ्यांचे तसेच पशुपालकांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी आहे असेच शेतकरी किंवा पशुपालक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे 10 एकरपेक्षा कमी जमीन असायला हवे.
  • शेतकरी किंवा पशुपालकाकडे किमान दोन गायी अथवा म्हशी असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड
  • बँक खाते
  • कुट्टी मशीन बिल
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • पशु विमा
  • जमिनीशी संबंधित कागदपत्रे

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो तर चला पाहूया काय आहे अर्ज करण्याची प्रक्रिया.

जर तुम्ही कडबा कुट्टी मशीन योजनेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू इच्छीत तर तुम्ही खाली दिलेल्या पायऱ्यांचा अवलंब करावा लागेल.

  • सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. –
  • अधिकृत संकेतस्थळ :-  https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
  • तुमच्या समोर होम पेज उघडेल.
  • होमपेज वर कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी “NEW REGESTRATION”/ “नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन नोंदणीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला “LOGIN ” करण्यासाठी आयडी आणि पासवर्ड तुमच्या इमेल आयडी वर येईल.
  • योग्य ती आयडी आणि पासवर्ड माहिती भरून यशस्वीरीत्या LOGIN करा.
  • LOGIN केल्यानंतर तुमच्या समोर एक योजना अर्ज उघडेल.
  • अर्जामध्ये विचारलेली माहिती योग्य तसेच अचूकरीत्या भरा.
  • अर्जामध्ये मागणी केलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करा.
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती तसेच कागदपत्रांची पूर्तता अचूकरीत्या केल्यानंतर “SUBMIT“या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल,त्या नोंदणी क्रमांकावरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.
  • अशाप्रकारे तुमचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून पूर्ण होईल.

जर तुम्ही कडबा कुट्टी मशीन योजनेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू इच्छीत तर तुम्ही खाली दिलेल्या पायऱ्यांचा अवलंब करावा लागेल.

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी कार्यालय ,किंवा ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी लागणारा मागणी अर्ज घ्या.
  • मागणी अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकरीत्या भरा तसेच सर्व कागदपत्रे जोडा.
  • सर्व माहिती तसेच कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्ही जेथून अर्ज घेतला होता त्या ठिकाणी जमा करा.
  • तुमच्या अर्जाची महाराष्ट्र राज्य अधिकृत विभागाकडून तपासणी होईल.
  • तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर अनुदानित रक्कम तुमच्या दिलेल्या खात्यामध्ये जमा होईल.
  • Kadba Kutti Machine

Leave a Comment