मुलींना मोफत शिक्षण 2024 योजनेविषयी
Free study scheme for girls:-महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही इच्छुक आणि पात्र मुलींना महाराष्ट्र कन्या मोफत शिक्षण योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवायचा असेल तर त्यांना वेगळे अर्ज करण्याची गरज नाही, ही योजना जुलै 2024 पासून सुरू होणार आहे राज्यातील विद्यार्थ्यांना सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. या योजनेंतर्गत प्रवेश घेताना वेगळा अर्ज करण्याची गरज राहणार नाही. लाभार्थी मुलींना इच्छित महाविद्यालयात प्रवेश घेताना प्रवेशपत्रासोबत वर नमूद केलेली कागदपत्रे जोडावी लागतील. आणि मुलींच्या निवड प्रक्रियेनंतर सर्व पात्र मुलींना उच्च शिक्षणासाठी थेट प्रवेश दिला जाईल.
Girls Free Education Scheme 2024 Full Information: मुलींना मोफत शिक्षण या योजनेची घोषणा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असून, येत्या जुन २०२४ पासून या योजनेचे लाभ राज्यातील गरीब मध्यमवर्गातील मुलींना होणार असून, आता सगळ्याच मुलींना उच्च शिक्षण अगदी मोफत घेता येणारआहे.Free study
इंजिनीयरिंग, मेडीकल, तंत्रशिक्षण सारख्या न परवडणाऱ्या, खर्चिक शिक्षणा सोबत एकूण ८०० कोर्स मध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे. या संबंधी अधिकृत घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
अलीकडच्या काळात शाळा, महाविद्यालये यांच्या प्रवेश शुल्कात भरमसाट वाढ झाल्याची दिसत आहे. यामुळे गरीब, मध्यम वर्गातील मुली-मुले अतिशय हुशार असून देखील केवळ प्रवेश फी अधिक असल्यामुळे उच्च शिक्षणापासून वंचित झाल्याचे दिसत आहे.
मुलींना मोफत शिक्षण योजना २०२४ पात्रता:-Free study
- या योजनेसाठी केवळ महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असणे गरजेचे आहे.
- या योजनेसाठी केवळ महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असणे गरजेचे आहे.
- ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 08 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल
- ज्या मुलींच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाते आहेत अशा मुली या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत.
- मुलिना मोफत शिक्षण योजनेसाठी वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.
- पुढील शिक्षण घेणाऱ्या मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे
मुलींना मोफत शिक्षण 2024 शासन निर्णय (GR)
योजनेचे नाव | मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 |
राज्य | महाराष्ट्र सरकार |
GR दिनांक | 05/07/2024 |
घोषणा | उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील |
कोर्स समाविष्ट | मेडिकल, तंत्रशिक्षण, इंजिनियरिंग सारख्या ८००+ कोर्स मध्ये मोफत शिक्षण घेण्याची संधी. |
पात्रता | महाराष्ट्रातील मुलींच्या विद्यार्थ्यांना, वार्षिक कुटुंब उत्पन्न रु.8.00 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे |
लाभार्थी | सुमारे 20 लाख मुली |
संस्थांचे समावेश | सरकारी, सहाय्यक खाजगी, अर्ध–सहाय्यक खाजगी, गैर–सहाय्यक महाविद्यालये, पॉलिटेक्निक इ. |
वार्षिक खर्च | ₹906.05 कोटी |
आवश्यक कागदपत्रे | आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, मागील वर्गाचे मार्कशिट, टीसी, इ. |
उद्देश | गरीब कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देणे |
आधिकारिक वेबसाइट | maharashtra.gov.in |
मुलींना मोफत शिक्षण योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे
मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.
- अर्जदार मुलीचे आधार कार्ड.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र/ दाखला.
- रहिवासी प्रमाणपत्र / डोमासाइल प्रमाणपत्र.
- शाळा सोडल्याचा दाखला (TC).
- मागील वर्षाचे गुणपत्रक/मार्कशीट.
- मुलीचा पासपोर्ट साईज फोटो.
मुलींना मोफत शिक्षण योजना अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही इच्छुक आणि पात्र मुलींना महाराष्ट्र कन्या मोफत शिक्षण योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवायचा असेल तर त्यांना वेगळे अर्ज करण्याची गरज नाही, ही योजना जुलै 2024 पासून सुरू होणार आहे राज्यातील विद्यार्थ्यांना सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. या योजनेंतर्गत प्रवेश घेताना वेगळा अर्ज करण्याची गरज राहणार नाही. लाभार्थी मुलींना इच्छित महाविद्यालयात प्रवेश घेताना प्रवेशपत्रासोबत वर नमूद केलेली कागदपत्रे जोडावी लागतील. आणि मुलींच्या निवड प्रक्रियेनंतर सर्व पात्र मुलींना उच्च शिक्षणासाठी थेट प्रवेश दिला जाईल.
मुलीना मोफत शिक्षण या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने नुकतेच ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे. सर्व पात्र मुलींनी या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन सरकारने केले आहे
मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल सुरु केले आहे. तिथे ऑनलाईन अर्ज सबमिट करायचा आहे.
महाडीबीटी पोर्टल ऑनलाईन अर्ज येथे करा : https://mahadbt.maharashtra.gov.in
मुलींना मोफत शिक्षण योजनाहेल्पलाईन नंबर & Email
मुलींना मोफत शिक्षण या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थिनींना काही अडचणी आल्यास त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन नंबर आणि हेल्प डेस्क सुरू केला आहे. ही हेल्पलाईन 0796134440, 07969134441 या क्रमांकावर आणि helpdesk.maharashtracet.org यावर संपर्क करावा. जर आपण भरलेली फीस वापस मिळत नसेल तर आपण रीतसर वरील हेल्पलाईन वर तक्रार करू शकत।thoughts on “मुलींना मोफत शिक्षण योजना 2024 – असा करा ऑनलाईन अर्ज आणि भरलेली फीस मिळवा परत”