Favarni Pump Yojana maharashtra 2024: शेती फवारणी पंप योजना महाराष्ट्र 2024 – 100% अनुदान

शेतकरी फवारणी पंप योजना संपूर्ण माहिती

ज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना पिकांना फवारणी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यामुळे त्यांना फवारणी पंपाचे कमतरता जाणवते. यामुळे शेतकऱ्यांना पिकांना कमी वेळात औषधे फवारण्यासाठी अडचणी येतात. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि शेती उत्पादन वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.Favarni Pump

शेतकरी मित्रांनो शेतकरी फवारणी पंप योजना महाराष्ट्र 2024 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी फवारणी पंपावर 100% अनुदान देण्यात येणार आहे. हा पंप इलेक्ट्रिसिटी वर चालणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मेहनत करायची गरज भासणार नाही. याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकरी फवारणी पंप योजना राबवली आहे.या योजनेत वैयक्तिक शेतकरी यांना बॅटरी संचलित फवारणी पंप (Battery Favarni Pump – Battery Spray Pump) १००% अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या बाबीच्या लाभासाठी खालील शेतकऱ्यांना अर्ज करावे लागणार आहे.

  • वेळेची बचत: आधुनिक बॅटरी संचलित फवारणी पंपाच्या सहाय्याने शेतकरी त्यांच्या पिकांना जलदगतीने फवारणी करू शकतील आणि त्यांच्याकडे इतर कामांसाठी अधिक वेळ उपलब्ध होईल.
  • पाण्याचा प्रभावी वापर: या योजनेमुळे पाण्याचा प्रभावी वापर होईल आणि पाणी वाचवण्यात मदत होईल.
  • शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल: पीक उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल.
  • खर्च कमी: शेतकऱ्यांना शेती फवारणी पंप खरेदी करण्यासाठी स्वतःचा खर्च करावा लागणार नाही, त्यामुळे त्यांचा खर्च कमी होईल
  1. शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. 
  2. शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. 
  3. यापूर्वी कृषी शेतकऱ्याने यांत्रिकीकरन योजनेचा लाभ घेतलेला नसावा 
  4. यापूर्वी बॅटरी चलित पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  5. बँक खात्याशी आधार कार्ड सलग्न असावे जेणेकरून आर्थिक व्यवहार सुलभरीत्या पार पडेल.
  6. शेतकऱ्याकडे ७/१२ ,८ अ असणे आवश्यक आहे.

१. पिकांवरील रोगराई नियंत्रण :

⦿ फवारणी पंपाच्या सहाय्याने पिकावर कीटकनाशकांची  फवारणी करून पिकावरील कीड तसेच रोगराई नियंत्रणामध्ये करता येत.

२. आर्थिक मदत :

⦿ १०० टक्के अनुदान प्रदान करून शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करणे.

३.उत्पादनामध्ये वाढ:

⦿ आधुनिक पंपाच्या सहाय्याने फवारणी करून पिकांवरील रोगराई कमी केल्याने शेतीतून मिळणाऱ्या  उत्पादनामध्ये वाढ होते.

४. शारीरिक कष्ट कमी करणे :

⦿ पारंपारिक औषध फवारणी पंपाद्वारे फवारणी करताना शेतकऱ्यास जास्त शारीरिक कष्ट सहन करावे लागत होते,त्याएवजी आधुनिक पंपाच्या सहाय्याने फवारणी करून शारीरिक कष्टही कमी करता येणार आहे.

५. आर्थिक बचत :

⦿ मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेंतर्गत अत्याधुनिक फवारणी पंप मोफत मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करून पैश्याची बचत होते.त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या एकूण खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.

आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ :

⦿ उत्पादनामध्ये वाढ तसेच खर्च कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होते.

मोफत बॅटरी फवारणी पंप योजना २०२४ वैशिष्टे खालीलप्रमाणे :

⦿ मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अत्याधुनिक फवारणी पंप हे विनामुल्य किंवा मोफत दिले जाणार आहेत.

⦿ या योजनेसाठी राज्यातील शेतकरी ज्यांच्याकडे स्व:ताची जमीन आहे तसेच जे महाराष्ट्र राज्याचे निवाशी आहेत अश्या शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे.

⦿ मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. हि अर्ज प्रक्रिया एकदम सुलभ ठेवण्यात आली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना अर्ज करताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

⦿ मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेंतर्गत मिळणारे पंप हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेले असतील जेणेकरून शेतकऱ्यांना औषध फवारणी वेळी कोणताही त्रास होणार नाही.

⦿ मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेद्वारे मिळणारे पंप हे सरकारद्वारा वितरीत करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना विनाविलंब तसेच योग्य पद्धतीने मिळणार आहेत.

⦿ राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी हे फवारणी पंप कसे वापरावे याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

  • आधार कार्ड
  •  ८ अ चा दाखला
  •  खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल. अहवाल तुम्ही कृषी अधिकाऱ्याकडून सुद्धा घेऊ शकता.
  •  जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
  •  स्वयं घोषणापत्र
  •  पूर्व संमती पत्र

Leave a Comment