बांधकाम कामगार योजना 2024-Bandhkam Kamgar

बांधकाम कामगार योजना Bandhkam Kamgar Yojana

सन २००१ च्या जनगणनेनुसार राज्यात एकुण सुमारे १४.०९ लाख इतके बांधकाम कामगार आहेत. तथापीअधिकृत आकडेवारी जाहीर झाली नाही. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत १५.९९% झालेली वाढ विचारात घेता ढोबळमानाने बांधकाम कामगारांची संख्या १७.५० लाख इतकी अपेक्षित आहे. Bandhkam Kamgar Yojana

  • राज्यात नोव्हेंबर २०१६ अखेर ५.६२ लाख बांधकाम कामगारांची लाभार्थी म्हणून मंडळात नोंदणी झाली असून त्यातील २.९९ लाख कामगारांची नोंदणी जीवित आहे.
  • महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, २०१५-१६ मधील माहितीनुसार राज्यात १.०२ लाख बांधकाम आस्थापना अस्तित्वात आहेत.
  • स्वयंपूर्ण त्रिपक्षीय मंडळ दि. ०१.०५.२०११ रोजी स्थापन झाल्यानंतर दि. ०३.११.२०११ रोजी लाभार्थ्याकडून अंशदान घेण्याबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यात आली
  • तद्नंतर कामगारांची नोंदणी प्रक्रिया कामगार आयुक्त कार्यालयातील उपलब्ध मनुष्यबळाद्वारे लागलीच सुरु करण्यात आली.

नोंदणी पात्रता निकषBandhkam Kamgar Yojana

  1. १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
  2. मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
  3. 1.बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
  4. 2.बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
  5. 3.बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
  6. 4.आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
  7. 5.बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा

मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…

  1. वयाचा पुरावा
  2. 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  3. रहिवासी पुरावा
  4. ओळखपत्र पुरावा
  5. पासपोर्ट आकाराचे 3 फोटो

नोंदणी फी – रू. 1/- व वार्षिक वर्गणी रू. 1/-

बांधकाम कामगारांसाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबिवल्या जातात. आता पुन्हा तीन नवीन योजना सुरू करण्यात येत आहे. 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता तीन नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे 

तीन योजना खलील प्रमाणे 

  1. बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता 51 हजार रुपये देण्यात येणार आहे.
  2. बांधकाम कामगाराचा अपघात होऊन हात किंवा पाय निकामी झाल्यास कृत्रीम हात किंवा पाय बसविण्यासाठी अर्थसहाय्य
  3. बांधकाम कामगाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याचे शव मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च मंडळ करणार आहे

बांधकाम कामगारांना संसार उपयोगी वस्तू

 संसार उपयोगी संच वस्तूनग
ताट4
वाटया8
 पाण्याचे ग्लास4
पातेले झाकणासह1
पातेले झाकणासह1
पातेले झाकणासह1
मोठा चमचा (भात वाटपाकरीता)1
मोठा चमचा (वरण वाटपाकरीता)1
पाण्याचा जग (2 लीटर)1
 मसाला डब्बा (7 भाग)1
डब्बा झाकणासह (14 इंच)1
डब्बा झाकणासह (16 इंच)1
डब्बा झाकणासह (18 इंच)1
परात1
प्रेशर कुकर 5 लिटर (स्टेनलेस स्टील)1
कढई (स्टील)1
स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह1
एकूण30
 Bandhkam Kamgar Yojana
बांधकाम कामगार योजना Bandhkam Kamgar Yojana

बांधकाम व इतर बांधकाम कार्य म्हणजे याचा संबंध निर्माण करणे, बदलणे, दुरुस्ती करणे, देखभाल करणे किंवा नाश करणे…

  • इमारती,
  • रस्त्यावर,
  • रस्ते,
  • रेल्वे,
  • ट्रामवेज
  • एअरफील्ड,
  • सिंचन,
  • ड्रेनेज,
  • तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,
  • स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह,
  • निर्मिती,
  • पारेषण आणि पॉवर वितरण,
  • पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
  • तेल आणि गॅसची स्थापना,
  • इलेक्ट्रिक लाईन्स,
  • वायरलेस,
  • रेडिओ,
  • दूरदर्शन,
  • दूरध्वनी,
  • टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,
  • डॅम
  • नद्या,
  • रक्षक,
  • पाणीपुरवठा,
  • टनेल,
  • पुल,
  • पदवीधर,
  • जलविद्युत,
  • पाइपलाइन,
  • टावर्स,
  • कूलिंग टॉवर्स,
  • ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,
  • दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.,
  • लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,
  • रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,
  • गटार व नळजोडणीची कामे.,
  • वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,
  • अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
  • वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
  • उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,
  • सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,
  • लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,
  • जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,
  • सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,
  • काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.,
  • कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,
  • सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,
  • स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,
  • सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,
  • जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
  • माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,
  • रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,
  • सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.

Leave a Comment