Annapurna Yojana Maharashtra: अन्नपूर्णा योजना सुरू वर्षातून 3 गॅस मिळणार मोफत.

Annapurna Yojana Maharashtra अन्नपूर्णा योजना

नमस्कार माता आणि भगिनींनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर राज्य शासनामार्फत एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे मार्फत महिलांना वर्षातून 3 एलपीजी गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहे. तर कोणती आहे ही नेमकी योजना व या योजनेचा लाभ आपल्याला कशाप्रकारे मिळणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. Annapurna Yojana

कारण सध्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पुढे या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता कोणती असणार आहे तसेच या योजनेच्या अटी व शर्ती काय असणार आहेत पाहूयात. यामध्ये कोणत्या महिलांनी गॅस सिलेंडर मिळणार? अशी सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण ( Refil) मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” या नावाने राबविण्यात येणार आहे तर पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल

भगिनींनो राज्य शासनाच्या वतीने महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली होती, परंतु आता त्याच बरोबर राज्य शासनाने नवीन योजना म्हणजे अन्नपूर्णा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. या योजने च्या माध्यमातून महिलांना वर्षात  3 एलपीजी गॅस सिलेंडर हे मोफत देण्यात येणार आहे. तर या योजनेचे आवश्यक कागदपत्रे, अटी व शर्ती, पात्रता व अर्ज प्रक्रिया पाहुयात.

  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभ घेतलेले लाभार्थी सदर योजनेस पात्र असतील.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिंण योजनेस पात्र आहेत अश्या महिला लाभार्थीच्या कुटुंब योजनेस पात्र असेल.
  • एका कुटुंबात ( रेशन कार्डनुसार ) केवळ ह्या योजनेच एकच लाभार्थी पात्र राहील.
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ केवळ १४,२ K.G गॅस सिलेंडर जोडणी असलेल्याना हा लाभ देय राहील.
  • या शासन निर्णयाप्रमाणे दि.०१ जुलै २०२४ रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेच्या लाभ मिळेल.
  • दिनांक: ०१ जुलै २०२४ नंतर विभक्त केलेले रेशनकार्ड धारक ह्या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
  • भगिनींनो सर्वप्रथम ज्या महिलांना पीएम उज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळालेले आहे त्यांना या योजनेचा थेट लाभ देण्यात येणार आहे.
  • तसेच ज्या महिलांना आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे  मिळालेले आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
योजनेचे नावAnnapurna Yojana (अन्नपूर्णा योजना)
लाभार्थीदारिद्र रेषेखालील म्हणजेच बीपीएल कार्ड असलेले कुटुंब.
अर्ज पद्धतीऑनलाइन व ऑफलाइन.
बजेट52 लाख कुटुंबांना मिळणार वार्षिक 3 मोफत गॅस.
विभागसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय.
अधिकृत वेबसाइटhttps://pmvishwakarma.gov.in/
  • आधार कार्ड
  • बँक खाते (आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेला पुरावा(रिफील बुक)
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरण्याची पोचपावती
  • रेशन कार्ड
  • 2 पासपोर्ट फोटो
  • चालू मोबाईल क्रमांक
  • ही योजना दारिद्र रेषेखालील म्हणजेच बीपीएल कार्ड असलेल्या कुटुंबांना विना अडथळा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केली आहेत. 
  • पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना देखील या सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे, परंतु पांढरे रेशन कार्डधारक जे कुटुंब असेल त्यांना या योजनेचा लाभ हा दिल्या जाणार नाही.
  • एका वर्षामध्ये हे तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील.
  • त्यानंतरची गॅस सिलेंडर जे असणार आहे ते मात्र आहे त्या किमती मध्ये खरेदी करावे लागतील.

1.सर्वप्रथम तुम्हाला अन्नपूर्णा योजनेची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.

2.त्यानंतर तुम्हाला योजनेसाठी नोंदणी करावी लागेल, नोंदणीसाठी नोंदणी पर्यायावर क्लिक करा.

3. त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नोंदणी फॉर्ममध्ये प्रविष्ट करावी लागेल, जसे की तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर इ.

4.नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि नंतर वेबसाइटच्या मेनू पर्यायावर क्लिक करावे लागेल.

5.आता मेनूमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Apply Online या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

6.त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, येथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसे की महिलेचे नाव, बँक खाते तपशील, आधार कार्ड क्रमांक, मोबाइल नंबर इत्यादी टाकावे लागतील.

7. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर, तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि सबमिट वर क्लिक करावे लागेल.

8.अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळवले जाईल.

9.अशा प्रकारे तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकता.

तर राज्य शासनामार्फत यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला असून, या योजनेअंतर्गत सर्वप्रथम तर आपल्याला प्रत्येक वेळेस आपण ज्या प्रकारे एलपीजी गॅस सिलेंडर खरेदी करतो व त्याची संपूर्ण पैसे देतो त्याचप्रमाणे आपल्या प्रक्रिया करायचे आहे. Annapurna Yojana Maharashtra 

तसेच आपण संपूर्ण रक्कम जमा केल्यानंतर या योजनेअंतर्गत आपल्याला आपण एलपीजी गॅस सिलेंडर वर जेवढी रक्कम अदा केली आहे तेवढी रक्कम थेट आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

आपल्याकडे जर उज्वला योजनेअंतर्गत मिळालेला गॅस असेल तर आपल्याला यामध्ये 830 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे

 आपल्याला जर उज्वला योजनेअंतर्गत लाभ मिळालेला नसेल तर आपल्याला यामध्ये 530 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे

Annapurna Yojana

Leave a Comment