निवडणूक जाहीर झाल्यानंतरचे नियम जाणून घ्या. आदर्श आचारसंहिता म्हणजे काय?Maharashtra Elections 2024

निवडणुकांची घोषणा केली आहे.

Maharashtra Elections 2024 महाराष्ट्र हे राज्य भारताच्या राजकीय गणितांवर आणि आर्थिक विकासावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम करीत आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण नेहमीच कुतूहलाचा विषय बनला आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या निवडणुकांची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांची घोषणा केली आहे.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23तारखेला मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे.

  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार)
  • अर्ज पडताळणीची तारीख – 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार)
  • अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2024(सोमवार)
  • मतदानाचा दिवस – 20 नोव्हेंबर 2024
  • मतमोजणीची तारीख – 23 नोव्हेंबर 2024
Maharashtra Elections 2024

निवडणूक आयोगाने लोकसभा, विधानसभा स्तरावरील निवडणूका स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने व्हाव्यात यासाठी काही नियम तयार केले आहेत. या नियमांना आचारसंहिता असे म्हणतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्व पक्ष, नेते आणि सरकारने या नियमांचे पालन करणे अनिवार्य असते. देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे. एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते. आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूदही आहे.

आदर्श आचारसंहिता मुख्यत्वे राजकीय पक्ष, उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी निवडणूक प्रचार, सभा आणि मिरवणुका, मतदान दिवसाचे उपक्रम आणि निवडणूक प्रक्रियेदरम्यान कसे वागावे हे नमूद केले आहे. कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार आचारसंहितेचे उल्लंघन करताना दोषी आढळल्यास निवडणूक आयोग त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करू शकतो.यामध्ये गुन्हेगाराला निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यासह आवश्यक असल्यास आयोग फौजदारी खटलाही दाखल करू शकतो. दोषी आढळल्यास तुरुंगवासही होऊ शकतो. Maharashtra Elections 2024

आता या आचारसंहितेची सुरुवात कशी झाली? तर आचारसंहितेची सुरुवात 1960 सालच्या केरळ विधानसभा निवडणुकीपासून झाली. राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून त्यांच्या सहमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली. कुठल्या कुठल्या नियमांचं पालन करणार हे पक्ष आणि उमेदवारांनी ठरवलं. 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर 1967 च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामध्ये नवनव्या गोष्टी आणि नियम जोडले जाऊ लागले. निवडणूक आचारसंहिता हा कुठल्याही कायद्याचा भाग नाही. पण आचारसंहितेतील काही नियम आयपीसीच्या कलमांच्या आधारे लागू करण्यात येतात. तरीही अनेकदा राजकीय पक्ष आणि उमेदवार आचारसंहितेच्या अटी गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे दर वेळी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्ष किंवा उमेदवारांवर आचारसंहितेचा भंग केल्याची कारवाई होताना दिसते.

Maharashtra Elections 2024
  • आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही सरकारी घोषणा, योजनांची घोषणा, प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी किंवा भूमिपूजन कार्यक्रम करता येणार नाहीत.
  • सर्व पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक आचारसंहितेअंतर्गत ‘भ्रष्ट आचरण’ आणि गुन्हेगारीच्या श्रेणीत येणाऱ्या अशा सर्व कामांपासून परावृत्त केले पाहिजे – जसे की मतदारांना पैसे देणे, मतदारांना धमकावणे, बनावट मतांना परवानगी देणे, मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर राहणे. मतदान केंद्राच्या हद्दीत प्रचार करणे, मतदान बंद झाल्यानंतरही प्रचार करणे आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहने उपलब्ध करून देणे.
  • जातीधर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे.
  • राजकीय कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोग निरीक्षकांची नियुक्ती करतो.
  • मतदानादरम्यान, मतदान केंद्राजवळील राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या छावण्यांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
  • कुठल्याही पक्षाला प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची असते.
  • सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे.
  • मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात. प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते.
  • पक्षाचे झेंडे, बॅनर इत्यादी कोणाच्याही जमिनीवर, घराच्या किंवा जागेवर परवानगीशिवाय लावता येणार नाहीत.
  • आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बदली करता येणार नाही. 
  • सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही. शीलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत.
  • शिबिरे साधी असावीत आणि तेथे कोणत्याही प्रकारचे प्रचार साहित्य असू नये. कोणतेही खाद्यपदार्थ देऊ नयेत.

Leave a Comment