महात्मा गांधी रोजगार हमी योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. यामध्ये १०० दिवसांपर्यत रोजगाराची कमी केंद्र सरकारची आहे व त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देते. योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून लाभार्थी यांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा होते. हे सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीने केले जाते. या योजनेंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे देखील घेता येतात. बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्याबरोबरच शाश्वत मालमत्ता निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. Rojgar Hami Yojana
राज्यात ग्रामीण भागातील नागरिकांना मजुरी मिळवण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो व केलेल्या कामाची मजुरी कमी व वेळेवर दिली जात नाही. तसेच पावसाळ्यात मजुरी उपलब्ध नसल्या कारणामुळे मजुरांना रोजगार मिळत नाही व त्यामुळे त्यांच्यासमोर दैनंदिन जीवनासाठी आवश्यक पैशांचा प्रश्न निर्माण होतो व कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील मजुरांच्या रोजगाराच्या या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र आणि राज्य शासनाने राज्यात Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. यामध्ये 100 दिवसांपर्यत रोजगाराची कमी केंद्र सरकारची देते व त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देते.
रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे देखील घेता येतात. व मजुरीची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT मार्फत जमा केली जाते त्यामुळे या योजनेअंतर्गत सर्व कामकाज हे पारदर्शक पद्धतीने केले जाते.
योजनेचा मूळ उद्देश हा ग्रामीण भागातील व्यक्तीना अकुशल कामाची मागणी केल्यावर कामे उपलब्ध करून देणे व त्याद्वारे कायम स्वरूपी मत्ता निर्माण करणे हा आहे.
रोजगार हमी योजनाचे उद्दिष्ट
- ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना रोजगार मिळवून देणे हा रोजगार हमी योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- नागरिकांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणे.
- ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करणे.
- ग्रामीण भागातील मजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
रोजगार हमी योजनाचे वैयक्तिक स्वरुपाची कामे Rojgar Hami Yojana
1. प्रधानमंत्री आवास योजना/इंदिरा आवास योजना अंतर्गत घरकुलचे अकुशल काम
2. फळबाग लागवड
3. वृक्षलागवड (पडीक जमिनीवर /रस्ता दुतर्फा /किनारपट्टी लगत /बांधावर इ.)
4. सिंचन विहीर
5. शेततळे
6. शोषखड्डे
7. कंपोस्ट खत/नाडेफ खत/गांडूळ खत टाकी
8. अझोला खत/ जैविक खत निर्मित साचा
9. गुरांचा/ शेळीचा गोठा
10. कुक्कुटपालन शेड
11. शेत बांध बंदिस्ती
रोजगार हमी योजनाचे अभिसरण अंतर्गत घेता येणारी कामे
राज्य अभिसरण आराखड्यामध्ये अकुशल भाग हा रोजगार हमी योजना मधून व कुशल भाग इतर योजना मधून दिला जातो. यामध्ये एकूण २८ राज्यामधील सर्व जिल्ह्यामध्ये घेता येऊ शकणारी कामे खालीलप्रमाणे आहेत.
1. शाळेसाठी संरक्षण भिंत बांधकाम
2. शाळेकरिता/मैदानाकरिता साखळी कुंपण
3. शालेय स्वयंपाकगृह निवारा
4. अंगणवाडी बांधकाम
5. ग्रामपंचायत भवन
6. सार्वजनिक जागेवर गोदाम
7. स्मशानभूमी शेड बांधकाम
8. बचत गटांच्या जनावरांसाठी सामुहिक गोठे
9. छतासह बाजार ओटा/ मासे सुकवण्यासाठी व विक्रीसाठी ओटा
10. सामुहिक मत्स्यतळे
11. सिमेंट रस्ता
12. डांबर रस्ता
13. पेव्हिंग block रस्ता
14. नाला मोरी बांधकाम
15. सिमेंट नाला बांध
16. RCC मुख्य निचरा प्रणाली
17. भूमिगत बंधारा
रोजगार हमी योजनाचे आवश्यक कागदपत्रे
ककुक्कुटपालन शेड (निवारा) बांधण्याकरिता प्रस्तावाची चेक लिस्ट
1. विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )
2. मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे)
3. ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत
4. जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा)
5. बँक पासबुक / पोस्ट बुक खाते तपशिल.
6. आधारकार्ड झेरॉक्स.
7. कोंबड्या नसल्यास बांधकाम झाल्यानंतर १ महिन्यात कोंबड्या घेण्याचा करारनामा (प्रतिज्ञापत्र) (100रु.बाँडपेपरवर).
8. कुक्कुटपालन शेडचा असेटमेंट उतारा, मात्र सदर असेसमेंट उताऱ्यावर अन्य हिस्सेदार
9. असल्यास त्यांचे संमत्तीपत्र मा.तहसिलदारसाहेब समोर (100 रु.बाँडपेपरवर)
10. (कुक्कुटपालन शेडचा असेसमेंट उतारा नसल्यास )
11. जागेचा 7/12 उतारा व 8 अ , मात्र 7/12 उताऱ्यात अन्य हिस्सेदार असल्यास सर्व हिस्सेदारांचे
12. मा.तहसिलदार यांचे समोर संमत्तीपत्र ( 100 रु.बाँडपेपरवर )आवश्यक.
13. हमीपत्र, मागणी पत्र
14. 100 पक्षी (कोबडया) असल्याबाबतचा पशुधन विभागाचा दाखला
जनावरांसाठी गोठा करिता प्रस्तावाची चेक लिस्ट
1. विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )
2. मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे)
3. ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत
4. जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा)
5. बँक पासबुक / पोस्ट बुक खाते तपशिल.
6. आधारकार्ड झेरॉक्स .
7. करारनामा (प्रतिज्ञापत्र) (100रु.स्टॅम्पवर).
8. गोठयाचा असेटमेंट उतारा, मात्र सदर असेसमेंट उताऱ्यावर अन्य हिस्सेदार
9. असल्यास त्याचे संमत्तीपत्र मा.तहसिलदारसाहेब समोर (100 रु.बाँडपेपरवर)
10. (गोठयाचा असेसमेंट उतारा नसल्यास )
11. जागेचा 7/12 उतारा व 8अ , मात्र 7/12 उताऱ्यात अन्य हिस्सेदार असल्यास
12. सर्व हिस्सेदारांचे मा.तहसिलदार यांचे समोर संमत्तीपत्र ( 100 रु.बाँडपेपरवर )आवश्यक.
13. हमीपत्र, मागणी पत्र
14. दुसऱ्या लाभासाठी १२ जनावरे व तिसऱ्या लाभासाठी १८ जनावरे असल्याबाबतचा पशुधन विभागाचा दाखला
शेळीपालन शेड बांधण्याकरिता प्रस्तावाची चेक लिस्ट
1. विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )
2. मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे)
3. ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत
4. जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा)
5. बँक पासबुक / पोस्ट बुक खाते तपशिल.
6. आधारकार्ड झेरॉक्स .
7. करारनामा (प्रतिज्ञापत्र) (100रु.बाँडपेपरवर).
8. शेळीपालन शेड असेटमेंट उतारा, मात्र सदर असेसमेंट उताऱ्यावर अन्य हिस्सेदार
9. असल्यास त्याचे संमत्तीपत्र मा.तहसिलदारसाहेब समोर (100 रु.बाँडपेपरवर)
10. (शेळीपालन शेडचा असेसमेंट उतारा नसल्यास )
11. जागेचा 7/12 उतारा व 8 अ , मात्र 7/12 उताऱ्यात अन्य हिस्सेदार असल्यास
12. सर्व हिस्सेदारांचे मा.तहसिलदार यांचे समोर संमत्तीपत्र ( 100 रु.बाँडपेपरवर )आवश्यक.
13. हमीपत्र, मागणी पत्र
14. दुसऱ्या लाभासाठी २० शेळ्या व तिसऱ्या लाभासाठी ३० शेळ्या असल्याबाबतचा पशुधन विभागाचा दाखला
मगांराग्रारोहयो– महाराष्ट्र अतर्गत सिंचन विहिरीसाठी आवश्यक कागदपत्रे
1. लाभाथ्याचे जॉबकार्ड आवश्यक.
2. ग्रामसभेचा ठराव आवश्यक
3. किमान 0.60 गुठे सलग क्षेत्र आवश्यक ,सदर क्षेत्राचा 7/12 उतारा व 8 अ आवश्यक.
4. प्रस्तावित विहिरीपासुन 500 फुटाच्या आत दुसरी विहिर नसलेबाबतचा तलाठी /ग्रामसेवक यांचा दाखला
5. 7/12 उताऱ्यात अन्य हिस्सेदार असल्यास मा. तहसिलदार साहेब यांच्या समोर सर्व हिस्सेदारांचे संमत्तीपत्र आवश्यक
किंवा
समूह सिंचन विहिर प्रस्ताव प्रकरण करावयाचे असल्यास 7/12 उतारामधील सर्व हिस्सेदारांचे मा. तहसिलदार साहेब यांचे समोर संमत्तीपत्र (100 रु.बाँडपेपरवर ) व सर्वांचे पाणी वाटप करारपत्र मा.सरपंच यांचे समोर आवश्यक (100 रु बाँडपेपरवर) .
6. प्रस्तावित विहिरीच्या ठिकाणी पाणी उपलब्ध असलेबाबतचा भुजल सर्वेक्षण विभागाचा दाखला आवश्यक.( प्रस्ताव सादर केल्यानंतर सदर दाखल्याची मागणी पं.स.मार्फत केली जाईल.)
शेाषखड्डा खोदणे व बांंधण्याकरिता आवश्यक कागदपत्रे (चेक लिस्ट)
1. विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )
2. मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे)
3. ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत
4. लाभार्थ्याच्या घरपत्रकाचा उतारा.(जर लाभार्थीचे नाव घरपत्रकावर नसल्यास संबधितांकडुन मा.सरपंच याचंे समोर साधे संमत्तीपत्र )
5. जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा)
6. बँक पासबुक / पोस्ट बुक खाते तपशिल.
7. ओळखपत्र / रेशनकार्ड / आधारकार्ड झेरॉक्स .
रोजगार हमी योजनाचे मजुरांना दिल्या जाणाऱ्या अन्य सुविधा
- कामाच्या ठिकाणी मजुरांना पिण्याच्या पाण्याची सोया, प्रथोमोपचार, विश्रांतीसाठी शेड, 5 पेक्षा जास्त मुले असल्यास दाईची सोय.
- जर मजूर आणि त्याच्या मुलांना दुखापत झाली तर अशा परिस्थितीत दवाखान्याचा संपूर्ण खर्च राज्य शासनाचा असेल व मजुरांना 50 टक्के वेतन दिले जाईल.
- मजुराला काम करताना अपंगत्व आले किंवा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत 50 हजारांची आर्थिक मदत दिली जाते.
- बँकेद्वारे अथवा पोस्टमार्फत 15 मजुरीचे प्रदान, अन्यथा ०.०५ टक्के विलंब आकार देय.
- मजुरांना वेतन चिठ्ठीचे वाटप
- कामाचे ठिकाण 5 किलोमीटर पेक्षा जास्त असल्यास प्रवास भाडे किंवा मजुरी दर 10 टक्के वाढवून दिला जातो.
- जर मजुरांना रोजगार मिळाला नाही तर अशा परिस्थितीत त्यांना दैनंदिन मजुरीचा 25 टक्के हिस्सा बेरोजगारी भत्ता म्हणून दिला जाईल.
रोजगार हमी योजनेचा फायदा
- रोजगार उपलब्ध: ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील मजुरांना त्यांच्या कौशल्यानुसार 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
- कौशल्य प्रशिक्षण: नागरिकांना रोजगार मिळवण्यासाठी कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील मजुरांना कौशल्य प्रशिक्षण देखील दिले जाते.
- रोजगाराच्या संधी ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होईल व मजुरांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
- रोजगार भत्ता: कामाची मागणी केल्यानंतर मजुराला 15 दिवसाच्या आत रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर त्याला रोजगार भत्ता दिला जाईल.
- ग्रामीण भागातील मजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
- मजुरांना वेळेवर वेतन मिळेल.
- आरक्षण : महिलांसाठी 33 टक्के आरक्षण दिले जाते.
- कामाचे वातावरण: मजुरांना सुरक्षित आणि आरोग्यदायी कामाचे वातावरण मिळते.
रोजगार हमी योजनेचा जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- रोजगारासाठी अर्ज करणारा व्यक्ती ग्रामीण भागातील रहिवाशी असावा.
- रोजगारासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्ष पूर्ण असावे.
- अर्जदाराची अंग मेहनतीची कामे करण्याची तयारी असावी.
- शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक
जॉबकार्ड काढण्याची पद्धत:
- मजुराला आवश्यक कागदपत्रांसहित आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक यांच्याजवळ संपर्क साधावा.
- ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक मजुराला रोजगार हमी योजनेचे अर्ज देतील.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.
- ग्रामसेवक अर्जदाराची सर्व माहिती रोजगार हमी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भरेल व अर्जदाराला जॉबकार्ड देईल.
काम मागण्याची पद्धत:
- अर्जदार मजुराला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवकांकडून रोजगार हमी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती तसेच जॉबकार्ड ची माहिती भरून सदर अर्ज ग्रामसेवकाकडे जमा करावा लागेल.
- ग्रामसेवक अर्जदार मजुराच्या अर्जाची सर्व माहिती रोजगार हमी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन भरेल.
सर्व माहिती भरून झाल्यावर अर्जदार मजुरास 15 दिवसाच्या आत रोजगार उपलब्ध करून दिला जाईल
Rojgar Hami Yojana Online Registration | Click Here |
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी | Click Here |
रोजगार हमी योजना फॉर्म | Click Here |
रोजगार हमी योजना जॉब कार्ड | Click Here |
रोजगार हमी योजना शासन निर्णय | Click Here |
रोजगार हमी योजना माहिती pdf | Click Here |