Solar Rooftop Subsidy Yojana 2024 : घरावर सोलर बसवा व मिळवा अनुदान !

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:थोडक्यात माहिती

दिवसेंदिवस विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होत चालली आहे तसेच वीज निर्मितीसाठी कोळशाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते परंतु सध्या कोळशाचे साठे कमी होत चालले आहेत त्यामुळे वीजनिर्मिती करण्यासाठी सरकारला खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे त्यामुळे  देशात नागरिकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी केंद्र सरकार कडून विविध प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करण्यात येते. सोलर रूफटॉप Solar Rooftop Subsidy
आज आपण केंद्र सरकारद्वारे राज्यातील नागरिकांना स्वतःच्या घरावर सोलर रुफटॉप बसविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र आहे.

सोलर रूफटॉप या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वतःच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी सोलर पॅनल च्या खरेदीवर अनुदान देण्यात येते जेणेकरून राज्यातील नागरिक स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जेचा वापर करू शकतील ज्यामुळे सरकार वर पडणारा विजेचा भार कमी होईल. या योजनेच्या सहाय्याने नागरिकांना त्यांचे घर, कार्यालय, कारखाना यांच्या छतावर सोलर पॅनल बसविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल

योजनेचे नावसोलार रूफटॉप सबसिडी योजना
ही योजना कोणी सुरू केलीकेंद्र सरकारने
योजनेचा लाभसोलर पॅनल खरेदी करण्यासाठी अनुदान मिळणार
योजनेचे लाभार्थीराज्यातील सर्व नागरिकांसाठी
सोलार रूट ऑफ सबसिडी योजनेचा मदत अंक1800-180-3333
अधिकृत संकेत स्थळhttps://solarrooftop.gov.in/
  • रूफटॉप सोलर पॅनलच्या सहाय्याने मासिक घरगुती बिलात बचत करणे.
  • रूफटॉप सोलर पॅनल ला लावण्यात आलेल्या नेट मीटरिंगद्वारे शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे ग्राहकांकडून विकत घेऊन त्यामुळे ग्राहकांना याचा थोडाफार आर्थिक लाभ मिळवून देणे.
  • घरगुती सौर ऊर्जा योजना ची सुरुवात केंद्र शासनाद्वारे राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे.
  • राज्यातील नागरिकांना सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • शासनावरील वाढत चाललेला विजेचा भर कमी करणे.
  • नागरिकांना मोफत ऊर्जेचा स्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • राज्यातील प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना कमी खर्चात वीज उपलब्ध होईल
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी 40 टक्के अनुदान देण्यात येते.
  • सोलर रूफटॉप योजना महाराष्ट्र च्या सहाय्याने राज्यातील नागरिक विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनतील.
  • योजनेअंतर्गत नागरिकांच्या विजेची बचत होईल जेणेकरून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
  • अनुदानाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
Solar Rooftop Subsidy
Solar Rooftop Subsidy
  • सौर ऊर्जेमुळे निर्माण होणारी जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे महावितरणाला विकता येणार आहे त्यामुळे ग्राहकाला आर्थिक फायदा होईल.
  • नागरिकांना लोडशेडिंग चा सामना करावा लागणार नाही व त्यांना लोडशेडिंग पासून मुक्तता मिळेल.
  • योजनेअंतर्गत बसविण्यात येणाऱ्या सोलर पॅनल ची किंमत 4 ते 5 वर्षात वसूल होते त्यामुळे पुढील 20 वर्षे उपभोक्ता मोफत विजेचा वापर करू शकते.
  • सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेअंतर्गत नागरिकांना विजेच्या बिलापासून मुक्ती मिळेल.
  • या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल.
  • सोलर रूफटॉप सब्सिडी योजनेअंतर्गत बसविण्यात येणाऱ्या सोलर पॅनल वर केंद्र सरकार कडून अनुदान देण्यात येते त्यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्ती या योजनेचा लाभ मिळवू शकते आणि स्वतःच्या घराच्या,कारखान्याच्या तसेच कार्यालयाच्या छतावर सोलर पॅनल बसवू शकते.
  • योजनेअंतर्गत बसविण्यात येणाऱ्या सोलर पॅनल ची 25 वर्षाची गॅरंटी असते त्यामुळे एकदा सोलर पॅनल बसविल्यावर उपभोक्त्यास कुठल्याच प्रकारच्या खर्चाची आवश्यकता नसते.
  • या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था तसेच निवासी कल्याणकारी संघटनांना या योजनेचा फायदा होईल.
  • या योजनेअंतर्गत सोलर पॅनल च्या सहाय्याने मोफत वीज निर्मिती करता येते.
  • या योजनेअंतर्गत पर्यावरणाला हानी ना पोहचवता वीज निर्मिती करणे शक्य होईल.
  • आणि उर्वरित वीज शासनाला विकत येते त्यामुळे उपभोक्त्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते.
  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील नागरिकांना घेता येईल
  •  या योजनेत महाराष्ट्र बाहेरील व्यक्तींना लाभ घेता येणार नाही
  •  या योजनेचा लाभ एका व्यक्तीला एकदा घेता येईल
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकार मार्फत अनुदान मिळते परंतु लाभार्थ्याला देखील थोडीफार रक्कम त्यामध्ये भरावी लागते.
  •  सोलार पॅनल बसवायचे आहे ती जागा त्या नागरिकाच्या स्वतःच्या मालकीची असणे आवश्यक आहे तेथे सोनल सोलार पॅनल बसवण्यात येईल
  •  या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  •  तसेच अर्जदाराचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  •  तसेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदार हा यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या अन्य कोणतीही सोलर योजनेचा लाभ त्याने घेतलेला नसावा. 
  • आधार कार्ड
  •  रेशन कार्ड
  •  पॅन कार्ड
  •  रहिवासी प्रमाणपत्र 
  • जमिनीचा सातबारा उतारा
  • उत्पन्नाचा दाखला
  •  बँक खात्याचे पासबुक
  •  पासपोर्ट आकाराचा फोटो
  •  विजेचे बिल
  •  मोबाईल नंबर
  •  सोलार सोलार पॅनल ज्या जागेवर बसवायचे आहे त्या जागेचा तपशील.
  • सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला जावे लागेल.
  • https://solarrooftop.gov.in/ ही शासनाचे अधिकृत संकेतस्होथळ आहे.
  • या सांकेतिक स्मथळावर गेल्यानंतर होम पेजवर Register Here वर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर Registration Form उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती ( State Distribution Company Consumer Account Number ) भरावी लागेल.
  • तुम्सहाला विचारलेली संपूर्र्वण माहिती तुम्ही अचूक भरायची आहे. त्यानंतर Next बटनावर क्लिक करावे लागेल.
  • तुमच्यासमोर आता एक नवीन पेज उघडेल त्नयामध्वीये तुम्नहाला तुमचा मोबाईल नंबर, तुमची ईमेल आयडी टाकावी लागेल.
  • सर्सव माहिती अचूक भरून झाल्र्वयानंतर Submit बटनावर क्लिक करा.
  • अशा प्रकारे तुमची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
  • आता तुम्हाला तुमच्या होम पेजवर Login Here वर क्लिक करून Registered Consumer Account Number व Registered Mobile टाकून Login करावे लागेल.
  • तुमच्यासमोर आता एक पेज उघडेल Rooftop Solar वर क्लिक करा.
  • तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत वेबसाईट वर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल तसेच विचारलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स अपलोड करावी लागेल.सर्व माहिती भरून झाल्यावर Save सेव बटनावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमची सोलर रूफटॉप सब्सिडी योजने अंतर्गतअर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Leave a Comment