ताडपत्री अनुदान योजना 2024 Tadpatri Anudan Yojana

Tadpatri Anudan Yojana ताडपत्री अनुदान योजना

आपले केंद्र सरकार ,राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना घेऊन येत असते तसेच जिल्हा परिषद देखील आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते. अस त्यातलीच एक योजनेबद्दल आपण जाणून घेऊया योजनेचे नाव आहे ताडपत्री अनुदान योजना. आपल्याला माहिती आहे आपला देश कृषिप्रधान देश आहे .आपल्या देशातील बहुतांश जनता ही शेतीवर अवलंबून आहे परंतु कधी कधी अनियमित पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होते. जसे की अवकाळी आलेल्या पावसामुळे कांदे खराब होणे किंवा जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा खराब होणे यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते .यावर पर्याय म्हणून आपण ताडपत्री वापरू शकतो. ताडपत्री द्वारे आपल्या पिकाचे नुकसान होण्यापासून रोखले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे पिकांचे नुकसान् वाचणार आहे. त्यामुळे आर्थिक होणारे नुकसान देखील वाचणार आहे .Tadpatri Anudan

या ताडपत्री च्या माध्यमातून शेतकरी आपले अन्नधान्य वाचवू शकतात तसेच अचानक आलेले पावसामुळे आपल्या जनावरांचा राखून ठेवलेला चारा देखील बचाव करू शकतात.ताडपत्री अनुदान योजना ही जिल्हा परिषद विभागामार्फत राबवली जाणारी योजना आहे.योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदी करण्यासाठी 50% च्या अनुदान दिले जाते.
आदिवासी बांधवांसाठी या योजनेअंतर्गत 85% पर्यंत अनुदान दिले जाते.

तर आता पावसाळा चालू झाला आहे आपल्या अन्नधान्य व आपल्या शेतकऱ्यांच्या जनावरांचा जो चारा आहे तो आपल्याला पावसापासून संरक्षित करायचा असेल तर आजच ताडपत्री योजनेसाठी अनुदान योजनेसाठी अर्ज करा व या द्वारे सरकारकडून 50 टक्के अनुदान मिळवा

Tadpatri Anudan
योजनेचे नावताडपत्री अनुदान योजना Tadpatri Anudan
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?योजना महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश काय आहे?शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
लाभार्थी राज्यातील शेतकरी
लाभताडपत्री खरेदी करण्यासाठी अनुदान
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
  • आपल्या शेतकरी बांधवांच्या अन्न धान्याचे नुकसान होऊ नये यासाठी सरकारने या योजनेची सुरुवात केली.
  • अचानक आलेल्या पावसामुळे जनावरांसाठी राखून ठेवलेल्या चारा त्याचे नुकसान रोखण्यासाठी या योजनेची सुरुवात केली गेली.
  • तड पत्रीचे अनेक उपयोग आहेत जसे की ग्रामीण भागातील शेतकरी कच्च्या घरांमध्ये राहतात त्यामुळे पावसाळ्यात त्यांचे घर गळते ताडपत्री चा वापर करून शेतकरी आपली संरक्षण पावसाच्या पाण्यापासून करू शकतात.
  • ताडपत्री अनुदान योजना हि राज्य शासनाच्या जिल्हा परिषद योजनेअंतर्गत राबविण्यात येणार एक योजना आहे.
  • लाभाची राशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
  • ताडपत्री अनुदान योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान दिले जाणार आहे.
  • ताडपत्री खरेदी केल्यानंतर त्याचा वापर करून शेतकरी त्यांच्या धान्याचे पावसापासून संरक्षण करू शकतील आणि त्यामुळे धान्याची नासाडी सुद्धा होणार नाही.

Tadpatri Anudan Yojana 2024 Eligibility

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराजवळ शेती योग्य जमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने यापूर्वी जर सरकारच्या सुरू केलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत ताडपत्रीचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका सदस्यालाच घेता येईल.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम स्वखर्चाने ताडपत्री विकत घ्यावी लागेल त्यानंतर या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाईल.
ताडपत्री अनुदान
Tadpatri Anudan
  • आधार कार्ड
  • ताडपत्री खरेदी बिल
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जमिनीचा 7/12 उतारा व 8 अ
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • शेतीचा नकाशा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • भागीदारी शेत जमीन असल्यास संमती पत्र
  • बँक खाते पासबुक
  • ताडपत्री अनुदान योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
  • यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम त्याच्या जवळील क्षेत्रातील कृषी कार्यालयात जावे लागेल.
  • तिथून ताडपत्री अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
  • अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील.
  • त्यानंतर अर्ज कृषी विभागात जमा करावा लागेल.
  • अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही ताडपत्री अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment